[50+] Bhavpurna Shradhanjali in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

Bhavpurna Shradhanjali Marathi

[50+] Bhavpurna Shradhanjali in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

Bhavpurna Shradhanjali in Marathi – एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, अशावेळी त्या व्यक्तीप्रती व त्याच्या कुटुंबियांप्रती संवेदना प्रकट करून आपण भावना व्यक्त करू शकता.

“मृत्यू हे अंतिम सत्य आहे.” हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो. जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून जाते, कि जी परत आपल्याला कधीच दिसणार नसते. अशावेळी आपल्या सर्वांनाच मोठे दुःख होते. अशावेळी तर त्या कुटुंबातील व्यक्ती खूपच हतबल होतात. जन्म व मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या घटनेच दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात.

अशावेळी एक मित्रपरिवार म्हणून, आपले हे कर्त्यव्य असते, कि त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करणे. असे केल्याने गेलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक मानसिक आधार देऊ शकता. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता.

अशा या संकट प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे योग्य ठरते. परंतु कधी कधी वातावरण इतके गंभीर होते कि, आपल्याला देखील काय बोलावे… ते सुचतच नाही. आपण अशावेळी त्यांना काही मराठी संदेशदेखील पाठवू शकता.

Bhavpurna Shradhanjali in Marathi

कष्टातून संसार फुलविला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा-क्षणाला…
आज हि तुमची पाहतो वाट,
यावे पुन्हा जन्माला…!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

सगळे म्हणतात की,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतही नाही…
पण हे कोणालाच कसे समजत नाही की,
लाख मित्र असले तरी
त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली!

Bhavpurna Shradhanjali

एकही दिवस जात नाही तुझी आठवण येत नाही
कितीही वर्ष झाली तरी तुझ्या आठवणी काही जात नाही
गेलास तू सोडून झाले होते आम्हाला दु:ख
पण अजूनही नाही होत तू सोडून गेल्यावर विश्वास
आठवणीत राहशील तू माझ्या कायम
पुन्हा येशील का परत? असा भाबड्या मनाला पडतो प्रश्न
आठवण तुझी आली दाटून
डोळ्यात आले पाणी, तुझ्याशिवाय राहू कसे आता सांग तू तरी.

आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल…
भावपूर्ण श्रद्धांजली!

Bhavpurna Shradhanjali In Marathi

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले |
मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा |
सोडूनी गेला अचानक… नव्हती कुणालाही याची जाण |
पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा |
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना…
भावपूर्ण श्रद्धांजली

हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे.
हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो…
मृत आत्म्यास शांती लाभो…

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख
सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
……………. सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं.
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो.

आज ………….आपल्यामध्ये नाहीत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

आज सकाळीच तू पुन्हा आलीस स्वप्नात
हळूच मला जवळ घेऊन तू उठवून गेलीस मला
तू नाहीस हे कळल्यावर उठायचे नव्हते जागेवरुन
पुन्हा ये ना गं परतून
घराचे दरवाजे आजही उघडे आहेत,
तू येशील अशी माझ्या मनाला एक आस आहे.

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली

Condolence Message in Marathi

जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.

आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली

आठविला सहवास तुझा
पापणी माझी ओलावली,
परत येईल यासाठी आमची मने आसुसली.

जाणारी व्यक्ती आपल्यानंतर
एक अशी पोकळी निर्माण करून जातात,
जी भरून काढणे कधीही शक्य नसते…
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो…
||भावपूर्ण श्रद्धांजली ||

आता सहवास नसला तरी,
स्मृती सुगंध देत राहील…
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील…!

आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा…

मृत्यूने कदाचित आपल्यापासून दूर नेले असेल,
परंतु माझ्या जीवनाचा नायक तू कायमचा आहेस…!

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे…
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं,
ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं,
आता सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण, तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे…!

शून्यामधुनी विश्व निर्मुनी,
किर्तीसुगंध वृक्ष फुलवुनी…
लोभ, माया, प्रीती देऊनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी…
अमर जाहला तुम्ही जीवनी…!

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
भावपूर्ण श्रद्धांजली

काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले.
तुझी आठवण येत राहील…
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली

तू सोबत नसलास तरी
तुझ्या आठवणी सोबत राहतील,
भावपूर्ण श्रद्धांजली

मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही…
पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

लोक म्हणतात की,
“एक जण गेल्याने दुनिया संपत नाही
किंवा थांबत नाही…
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख लोक मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…!

अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख…
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखविला मोठेपणा…
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…

अस्वस्थ होतयं मन
अजूनही येते आठवण ……..
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध
दररोज दरवळत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

………. तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही.
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

आठवण येते त्या प्रेमाची जे
प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे
क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.

Also Read This
[500+] मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles | Marathi Kodi

Condolence Message in Marathi

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।

नसतेस जेव्हा तू घरी…
मन एकदम एकटे एकटे वाटते…
आजुबाजूला इतकी लोकं असूनही
कायम एकटे वाटते…
आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली

आई… तुझा आवाज आता कानी पडणार नाही…
याचे दु:ख होत आहे.
पण तू जिथे असशील
तिथे माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही.
का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती मिळो.

गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते..
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे हीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो
भावपूर्ण श्रद्धांजली!

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली

आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली

आज आमच्यात नसलात तरी
तुमच्या आठवणींचे गाठोडे
मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.

जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले
आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे
भावपूर्ण श्रद्धांजली

आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील…!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

स्वर्गीय ……… यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक, आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

देव मृत आत्म्यास शांती देवो
कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो
भावपूर्ण श्रद्धांजली

कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला
आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला.

अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिलो
आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिलो.

आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
ते एक देवमाणुस होते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…!

आपल्याच लोकांनी केला घात,
साऱ्यांनीच रचला कट,
ना दिली कुणी साथ,
ना यावी अशी पुन्हा पहाट…!

काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या,
आता त्याचे दु:ख होतेय,
तू लवकर सोडून गेलास
याचे दु:ख मनाला छळते आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली

जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही.
भावपूर्ण आदरांजली!

जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही,
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही.

समारोप

या जगात फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची शाश्वती देता येते, ती गोष्ट म्हणजे “मृत्यू”. आपल्या सर्वांनाच एक ना एक दिवस हि पृथ्वी सोडून जायचे आहे. मृत्यू हि बाब आपल्या हातातील नाही. मृत्यूपुढे आपण कोणीही काहीही करू शकत नाही. ज्यावेळी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे अचानक निधन होते, त्यावेळी त्या कुटुंबासाठी तो मोठा धक्का मानला जातो. अशावेळी एक मित्र म्हणून, सहकारी म्हणून, नातेवाईक म्हणून आपले कर्त्यव्य असते कि, त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे.

अशावेळी आपल्यापैकी बहुतेक लोकांना काय बोलावे ते कळत नाही. कारण ते वातावरणच इतके गंभीर असते कि, आपल्या तोंडून शब्दच फुटत नाही. अशावेळी हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्ही त्या व्यक्तींना पाठवू शकता. असे केल्याने जरी गेलेली व्यक्ती परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या जाण्याने त्या कुटुंबाला जो मानसिक धक्का बसलेला असतो, त्यातून त्यांना बाहेर पडण्यास मदत होईल. त्यांना हे कळेल कि या भयानक दुःखाच्या प्रसंगी ते एकटे नाहीयेत. तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर आहात.

FAQ’s

भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय?

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे निधन होते, त्यावेळी त्या व्यक्तीप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी जी शब्दरचना उपयोगात आणली जाते, ती म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली आहे.

भावपूर्ण आदरांजली म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या स्मरणार्थ जे काही चांगले बोलले जाते किंवा त्या व्यक्तीचा आदर करण्यासाठी जे काही चांगले बोलले जाते ती आदरांजली.

मराठीत निधन संदेश कसा लिहायचा?

भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली या पद्धतीने किंवा अजून इतर संदेशांच्या मदतीने मराठीत निधन संदेश लिहितात.

एखाद्याचे निधन झाल्यावर तुम्ही काय म्हणता?

भावपूर्ण श्रद्धांजली किंवा भावपूर्ण आदरांजली असे म्हणतात.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply